Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशजनतेचा पैसा का लूटला; राहुल गांधींचा मोदींना प्रश्न!

जनतेचा पैसा का लूटला; राहुल गांधींचा मोदींना प्रश्न!

महत्वाचे…
१.पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करुन तिसरा प्रश्न विचारला २. राहुलच्या प्रश्नांना मोदी कसे उत्तर देणार ३. एकामागून एक ट्विटने भाजपाची गोची


नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. आज पुन्हा राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना ट्विट करत गुजरातवरून प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधींनी यांनी आपल्या या ट्विटमध्ये ‘२२ सालों का हिसाब, गुजरात मांगे जवाब’ असे म्हणत प्रश्न विचारला आहे. २००२-१६ मधील काळात ६२ हजार ५४९ कोटी रुपयांची वीज खरेदी करून ४ खासगी कंपन्यांचा खिसा का भरला? सरकारी वीज कारखान्यांची की क्षमता ६२ टक्क्यांनी कमी करून खासगी कंपन्यांकडून ३ रुपये प्रति यूनिट मिळणारी वीज २४ रुपयापर्यंत का खरेदी केली? यातून जनतेची कमाई का उडवली? असे थेट प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहे.
या अगोदर राहुल गांधींनी २८ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबरला ट्विट करत पंतप्रधान मोदींना विचारले होते. त्यांनी पंतप्रधानांना विचारले होते की, ‘१९९५ मध्ये गुजरातवर ९ हजार १८३ कोटीचे कर्ज होते. २०१७ मध्ये गुजरातवर २ लाख ४१ हजार कोटी कर्ज झाले. म्हणजे प्रत्येक गुजराती नागरिकावर ३७ हजाराचे कर्ज आहे. तुमच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाचा आणि प्रसिद्धीची शिक्षा गुजरातच्या जनतेने का भोगायची ?’
२८ नोव्हेंबरला राहुल गांधींनी ट्विट करत आणखी एक प्रश्न विचारला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘२०१२ मध्ये ५० लाख नवी घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ५ वर्षात फक्त ४ लाख ७२ हजारच घरे बनवण्यात आली. मग हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ४५ वर्ष अजून लागणार का?’ भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये मागील २२ वर्षांपासून सत्तेत आहे तरीही दिलेली आश्वासने पूर्ण न करू शकल्याच्या पार्श्वभूमिवर हा प्रश्न विचारण्यात आला होता.

22 सालों का हिसाब,#गुजरात_मांगे_जवाब

प्रधानमंत्रीजी से तीसरा सवाल:

2002-16 के बीच ₹62,549 Cr की बिजली ख़रीद कर 4 निजी कंपनियों की जेब क्यों भरी?

सरकारी बिजली कारख़ानों की क्षमता 62% घटाई पर निजी कम्पनी से ₹3/ यूनिट की बिजली ₹24 तक क्यों ख़रीदी?

जनता की कमाई, क्यों लुटाई?

— Office of RG (@OfficeOfRG) December 1, 2017

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments