Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशकोळसा घोटाळ्यात मधू कोडांचे हात काळे!

कोळसा घोटाळ्यात मधू कोडांचे हात काळे!

महत्वाचे…
१. उद्या शिक्षा सुनावली जाणार २. कट रचणे, फसवणूक करणे आणि पदाचा दुरूपयोग करणे यासाठी कोडा दोषी ३. कोडा यांच्याव्यतिरिक्त माजी कोळसा सचिव एस.सी. गुप्ता आणि झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसूही दोषी


रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना कोळसा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. कट रचणे, फसवणूक करणे आणि पदाचा दुरूपयोग करणे यासाठी कोडा यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीतील विशेष सीबीआय कोर्टाने कोडा यांच्याव्यतिरिक्त माजी कोळसा सचिव एस.सी. गुप्ता आणि झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसू यांनाही कोडा यांच्याप्रमाणे दोषी ठरवण्यात आलं असून त्यांनाही उद्याच शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

झारखंडमधील कोळसा खाण वाटपात कोलकात्यातील विनी आयर्न आणि स्टील कंपनीला नियमबाह्य पद्धतीने खाण वाटप केल्याचे कोडा आणि इतर दोन सनदी अधिकाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. या कंपनीला झारखंडमधील राजहरा इथल्या कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या. तत्कालीन कोळसा सचिव हे कोळसा खाण वाटप करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ४० प्रकरणं निकाली काढली होती. या प्रक्रियेत कुठेही पारदर्शकता नव्हती असं न्यायालयात सिद्ध झालं आहे. ज्यामुळे करदात्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं. गुप्ता यांच्याविरोधात आत्तापर्यंत ८ खटले दाखल झालेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments