skip to content
Friday, May 17, 2024
Homeदेशकर्नाटकचे नाटक : दोन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे सरकार धोक्यात?

कर्नाटकचे नाटक : दोन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे सरकार धोक्यात?

अपक्ष आमदार एच नागेश आणि केपीजेपीचे आमदार आर शंकर यांनी कर्नाटक सरकारचा पाठींबा काढला असून भाजपाचे जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी दावा केला आहे कि दोन  ते तीन  दिवसांत कर्नाटकात सत्ता स्थापन करणार कर्नाटकातील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील जेडीएस आणि काँगेस सरकार सध्या संकटात आलेल असून दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा मागं घेत असल्याचं पत्र राज्यपालांना पाठवलं आहे.

या दोन फुटीर आमदारांची प्रतिक्रिया घेतली असता आमदार एच. नागेश म्हणाले “आम्ही स्थीर आणि चांगल्या सरकारसाठी जेडीएस आणि काँग्रेसला पाठींबा दिला होता, पण दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्यानं मी भाजप सोबत जाणार आहे” तर आमदार आर.शंकर म्हणाले कि कर्नाटकामध्ये काम करणारं सरकार हवं असल्यानं असल्यानं मी पाठिंबा काढून घेत आहे

दरम्यान,  एच. नागेश आणि आर. शंकर यांनी कुमारस्वामी सरकारचा पाठींबा मागं घेतल्यानं कर्नाटकात राजकीय समीकरण बदलून भाजपचं सरकार येण्याची शक्यता बळावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments