Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशअर्थसंकल्पातून नोकरदारांच्या पदरी निराशाच

अर्थसंकल्पातून नोकरदारांच्या पदरी निराशाच

नवी दिल्ली: सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून दिलासा मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या नोकरदार वर्गाचा हिरमोड झाला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे मोबाईल आणि टीव्हीवरील कस्टम ड्यूटी वाढवून सरकारने मेक इन इंडियाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

१. टीव्हीवरील कस्टम ड्यूटीत भरघोस वाढ, टीव्ही देखील महागणार

२. मोबाईल महागणार तर काजू उद्योगला दिलासा

३. २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांचा कॉर्पोरेट कर २५ टक्के

४. अडीच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त उत्पन्न, अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर, पाच ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, १० लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के

५. नोकरदार वर्गाच्या पदरी निराशाच, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

६ .या वर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ लाख करदाते वाढले

७ .इन्कम टॅक्सचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष करात १८.७ टक्क्यांनी वाढ

८ .खासदारांचा पगार एप्रिल २०१८ पासून वाढणार, दर पाच वर्षांनी महागाई दरानुसार पगार वाढत जाणार

९. राष्ट्रपतींचा पगार प्रति महिना ५ लाख रुपये, उपराष्ट्रपतींचा पगार प्रती महिना ४ लाख रुपये

१०. १ लाख ग्राम पंचायतींचा ऑप्टिक फायबर केबलने जोडणार, ग्रामीण भागात ५ लाख ठिकाणी वाय- फाय सेवा सुरु करणार

११ ‘उडान’ योजनेअंतर्गत वापरात नसलेले ५६ विमानतळ आणि ३१ हेलिपॅड जोडणार

१२ विमानतळांची संख्या पाच टक्क्यांनी वाढवणार

१३ ‘हवाई’ चप्पल वापरणारेही आता हवाई प्रवास करु शकतील

१४ बडोद्यात रेल्वे विद्यापीठ सुरु करणार

१५ ३६०० किमीची ट्रॅक नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले

१६. मुंबई लोकलवरील नवीन मार्गांसाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतुद, एलिव्हेटेड मार्गाचाही यात समावेश

१७. देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार

१८. रेल्वेसाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतुद

१९. आगामी चार वर्षात शाळांच्या विकासावर १ लाख कोटी रुपये खर्च करणार

२०. अमृत योजनेअंतर्गत ५०० शहरांना शुद्ध पाणी पुरवणार

२१. कृषी कर्जासाठी ११ लाख कोटी रुपये

२२. क्षयरोग रोखण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद

२३.देशभरात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार, प्रत्येक लोकसभा २४.मतदारसंघात एक मोठे रुग्णालय

२५.१० कोटी गरीब कुटुंबांसाठी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली असून ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असेल; जेटलींचा दावा

२६. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुषमान भारत योजना राबवणार

२७. आदिवासी मुलांसाठी एकलव्य शाळा

२८. शिक्षणाचा दर्जा हा अजूनही चिंतेचा विषय आहे, १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार, डिजिटल शिक्षणावर भर

२९. २,६०० कोटी रुपये देशात सर्वात कमी सिंचन असलेल्या जिल्ह्यासाठी

३०. स्वच्छ भारतच्या माध्यमातून ६ कोटी शौचालयाची निर्मिती, आता आणखी २ कोटी शौचालय बांधणार

३१.मध्यमवर्ग आणि गरीब केंद्र सरकारच्या केंद्रस्थानी आहेत, ८ कोटी महिलांना मोफत गॅसजोडणी देणार

३२.फूड प्रोसेसिंगसाठी १४०० कोटी रुपये

३३. मत्स्योत्पादन आणि पशूपालनासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतुद

३४. कृषी उत्पन्न बाजार समितींच्या विकासासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद

३५. बांबू शेतीच्या विकासासाठी १,२९० कोटी रुपयांची तरतुद

३६. शेतमालाचे मार्केटिंग करण्याची गरज असून यासाठी कृषी आणि वाणिज्य मंत्रालय संयुक्तपणे प्रयत्न करतील

३७. शेतकरी, गरीब वर्गांसाठी अनेक योजना सुरु केल्या

३८. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील तिसरा टप्प्याची अंमलबजावणी करणार: जेटली

३९.शेतकऱ्यांना उत्पादन मुल्याच्या दीडपट हमीभाव, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार: जेटली

४०. शेतकऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे कृषी उत्पन्न दर विक्रमी स्तरावर: जेटली

४१. अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा: जेटली

४२. व्यवसायपूरक देशांच्या यादीत भारताची आगेकूच: जेटली

४३.  जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करप्रणाली सोपी झाली: जेटली

४४.मोदी सरकारच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला गती: जेटली

४५. गरिबी दूर करुन सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न: जेटली

४६. संसदेत अरुण जेटलींकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments