Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशअखेर डॉक्टरांचा संप मागे

अखेर डॉक्टरांचा संप मागे

नवी दिल्ली : आयएमएनं नॅशनल मेडिकल कमिशन बिलाच्या मुद्दयावर आज १२ तासांचा बंद पुकारला होता. पण हे विधेयक स्टॅंडिंग कमिटीकडे पाठवण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

नॅशनल मेडिकल कमिशन बिलच्या मुद्यावरुन खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संघटनेचा पुकारलेला १२ तासाचा बंद, वेळेपूर्वीचं मागे घेण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे पाठवत असल्याची माहिती संसदेत दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

या विधेयकातील वेगवेगळ्या तरतुदींवर आयएमएनं आक्षेप घेतला होता.

आयएमएच्या विरोधाची कारणं

१) वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.

कोणतीही खासगी वैद्यकीय महाविद्यालयं पदवी आणि पदव्युत्तर जागा आपल्या मनाप्रमाणे वाढवू शकतील.

२) या महाविद्यालयांतील फक्त ४० टक्के जागांवर सरकारचं नियंत्रण असणार आहे.

६० टक्के जागांची फीस खासगी वैद्यकीय महाविद्यालयं ठरवणार असल्यानं गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण नीट घेता येणार नाही.

३) दंडांच्या दरामध्ये ५ कोटी ते १०० कोटी अशी रक्कम असल्यानं भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता

४) हे विधेयक जनविरोधी, श्रीमंतांच्या बाजूनं आहे. असाही आरोप करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments