Tuesday, December 3, 2024
Homeदेश१३ ऑक्टोबरचा प्रस्तावित संप पेट्रोल पंपचालकांनी घेतला मागे

१३ ऑक्टोबरचा प्रस्तावित संप पेट्रोल पंपचालकांनी घेतला मागे

नवी दिल्ली – १३ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेला देशव्यापी संप पेट्रोल पंपचालकांनी मागे घेतला आहे. बुधवारी दुपारी पेट्रोल पंपचालकांच्या संघटनांकडून हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पेट्रोल व डिझेलच्या डीलर्सच्या द फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स, द ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, सीआयपीडी या तीन संघटनांनी एकत्रित येत आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरला एक दिवसीय संपाची हाक दिली होती. मात्र महाराष्ट्रातील संपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

पेट्रोल पंपचालकांच्या (डीलर्स) विविध मागण्या मान्य करूनही अवास्तव मागण्यांसाठी संप केल्यास डीलर्सवर कारवाई करण्याचा इशारा इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीनही तेल कंपन्यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत दिला होता. सामान्यांना वेठीस धरण्यापेक्षा डीलर्सनी चर्चेने प्रश्न सोडवण्याचे आवाहनही इंडियन ऑइलचे वितरण विभागाचे संचालक बलविंदर सिंग कांत यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments