पाटणा: हिमाचलप्रदेश,गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सुब्रमण्यम् स्वामींनी पुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहील असा दावा केलाय. कोर्टाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाटण्याला विराट हिंदुस्तान संघानं आयोजित केलेल्या संमेलनात भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामींनी ‘बनायेंगे मंदिर’चा नारा दिलाय. डिसेंबरपासून राम मंदिरावर दररोज सुनावणी होणार आहे. त्यामुळे जास्तीजास्त दोन महिन्यात कोर्टाचा निर्णय लागणार आहे असंही स्वामी म्हणालेत. राम मंदिराच्या निर्माणासाठी लागणार साहित्य तयार आहे. त्यामुळे परवानगी मिळताच पुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहिलं असंही स्वामी म्हणालेत.
तसंच फक्त विकासाच्या मुद्यावर कुणी मतं मिळवू शकत नाही. निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर हिंदुत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे असंही स्वामी म्हणाले.