नवी दिल्ली : सध्या राहुल गांधी गुजरात दौर्यावर आहेत आणि त्यांची वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात हिट होत आहेत. खास करून ट्विटरवर त्यांची स्टेटमेंट ट्रेंड होताना दिसत आहेत. गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसची डिजिटल टीम अतिशय सक्रियपणे झाली आहे.
राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या गुजरात भेटीदरम्यान,कॉंग्रेस सोशल मीडिया टीमने केंद्र सरकारच्या विरोधात ‘विकास पगल हो गया’ मोहिम सुरू केली. ज्यानंतर राहुल यांचे वक्तव्य प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून ते चर्चेचा विषय बनले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर राहुल .यांच्या वक्तव्यांना ट्रेड करणाऱ्या टीम आणि मास्टरमाईंडचे नाव विचारले जात आहे.
या सर्वामागे दिव्या स्पंदन उर्फ राम्या हिचा हात आहे. नुकतेच पक्षाच्या सोशल मिडिया टीममध्ये बदल करण्यात आले. पक्षाने दिपेंद्र हुडा आणि अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे.
राम्याच्या सोशल मीडिया टीममध्ये ८५ टक्के महिला आहेत. जेव्हा राम्या ने या टीमची ताबा घेतला तेव्हा पार्टीच्या डिजिटल वॉर रूममध्ये केवळ तीन महिला होत्या. यानंतर, तिने आपल्या टीममध्ये अनेक प्रोफेशनल्सची भरती केली आणि सेलची ताकद दुप्पट केली. यामूळे सोशल मीडियावर कॉंग्रेस पक्षाची सक्रियता वाढलेली दिसत आहे.
कोण आहे दिव्या ?
दिव्या दक्षिण भारतात राम्या नावाने प्रसिद्ध आहे. ती एक कन्नड अभिनेत्री आहे. दिव्याचा जन्म २९ नोव्हेंबर १९८२ बेंगळुरू येथे झाला. दिव्याने २००३ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१२ मध्ये तिने कॉंग्रेस जॉईन केले होते.
दिव्याची आई काँग्रेस पक्षाची दिग्गज नेता आहे, तर तिचे वडील एक व्यवसायिक आहेत. त्या २०१३ मध्ये कर्नाटकच्या मंड्या मतदारसंघातून लोकसभा पोटनिवडणुक जिंकून संसद सदस्य बनल्या होत्या. दरम्यान २०१४ मध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. सध्या ती कॉंग्रेसचा सोशल मीडिया कम्युनिकेशन बघत आहेत.
कॉंग्रेसमध्ये काही नेत्यांना आधीच डिजिटल माध्यमांच्या शक्तीची जाणीव होती. पार्टीचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे एकमेव नेते ज्यांचे मे २००९ मध्ये ट्विटर अकाऊंट होते. त्यांचे 6 हजार फॉलोअर्स होते. सद्यस्थितीत, त्यांचे ६० लाख फॉलोअर्स आहेत, जे काँग्रेस नेत्यांमध्ये सर्वाधिक आहेत.