गुजरात: गुजरात दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी आपल्या अमेठी मतदारसंघाचा काहीच विकास केला नसल्याचा आरोप करत भाजपने येथील विकासकामे सुरू केल्यामुळे काँग्रेस पक्ष गोंधळला असल्याचा टोला लगावला. अमित शहा गुजरातला येतात. पण राहुल गांधी हे इटलीला पळून जातात. तेव्हा त्यांना गुजरातची आठवण येत नाही. जिथे जिथे राहुल गांधी प्रचार करायला जातात. तिथे काँग्रेसचा पराभव नक्की असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.