Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशमुलाच्या बचावासाठी सरसावले अमित शाह

मुलाच्या बचावासाठी सरसावले अमित शाह

अहमदाबाद– भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता. कोणतीही सरकारी जमीन जयनं घेतली नाही. हे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. काँग्रेसकडे जय शाह यानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे असल्यास न्यायालयात त्यांनी सादर करावे, असं आवाहनही अमित शाह यांनी काँग्रेसला दिलं आहे.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. परंतु आतापर्यंत त्यांनी एकदाही मानहानीचा खटला दाखल केलेला नाही, याकडेही अमित शाहांनी लक्ष वेधलं. माझ्या मुलानं न्यायालयात जाऊन १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमच्यावर आरोप लावल्यानंतर आम्ही १०० कोटींचा मानहानीचा खटला भरला. काँग्रेसवर आतापर्यंत एवढे आरोप झाले, त्यांनी किती खटले भरले ?, असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात सादर करावे, असंही ते म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments