Sunday, May 26, 2024
Homeदेशमहाराष्ट्रातील धुळ्याचा जवान काश्मीर दहशतवादी हल्ल्यात शहीद

महाराष्ट्रातील धुळ्याचा जवान काश्मीर दहशतवादी हल्ल्यात शहीद

जम्मू-काश्मीर : काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झाले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा समावेश आहे. शहीद जवान धुळ्यातील साक्री गावामधील असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्यात एक जवान जखमीही झाला आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरु आहे. भारतीय जवानांकडून या भागात सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची माहिती समजते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments