Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशनोटाबंदीच्या घोषणे नंतर राहुल गांधींनी या दोन व्यक्तींना फोन केला

नोटाबंदीच्या घोषणे नंतर राहुल गांधींनी या दोन व्यक्तींना फोन केला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीला ८ नोव्हेंबरला म्हणजे उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. विरोधी पक्ष हा काळा दिन साजरा करणार आहेत. तर भाजप हा काळे धन विरोधी दिन म्हणून साजरा करणार आहे. यातच आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नोटाबंदीची घोषणा ऐकताच आपण दोन व्यक्तींना फोन लावला होता, असं ते सांगत आहेत.

पहिला फोन कुणाला लावला?

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा राहुल गांधींनी सर्वात अगोदर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना फोन केला. या निर्णयामागचा हेतू काय असू शकतो, असा प्रश्न राहुल गांधींनी फोन करुन विचारला. त्यानंतर चिदंबरम ३० सेकंद हसत होते, असं राहुल गांधी म्हणाले.

दुसरा फोन कुणाला लावला?

पी. चिदंबरम यांच्याकडून उत्तर मिळालं नाही. त्याच्यानंतर अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना फोन केला. त्यांना फोन लावून मोदी सरकारचा हा निर्णय सांगितला तेव्हा ते 20 सेकंद काहीही बोलले नाहीत. २० सेकंदानंतर त्यांनी सांगितलं, जे ऐकलंय त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. ‘’या लोकांनी हे काय केलं?’’ अशी मनमोहन सिंह यांची पहिली प्रतिक्रिया होती, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments