नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी सलग दहाव्या वर्षी भारतीय श्रीमंतांच्या यादीत टॉपवर राहिले आहे. त्यांची एकूण संपत्ती 38 यूएस बिलियन डॉलर अर्थात जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी ती 1.5 लाख कोटी रुपये होती. फोर्ब्स नियतकालिकाने भारतातील 2017मधील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात विप्रोचे अजीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 19 बिलियन यूएस डॉलर (साधारण 1.2 कोटी रुपये) आहे.
भारतातील 10 श्रीमंत व्यक्ती
1 – मुकेश अंबानी
2 – अजीम प्रेमजी
3 – हिंदुजा ब्रदर्स
4 – लक्ष्मी मित्तल
5 – पलोनजी मिस्त्री
6 – गोदरेज फॅमिली
7 – शिव नादर
8 – कुमार बिर्ला
9 – दिलीप संघवी
10 – गौतम अदानी