दिल्ली: गौतम बंबवाले हे चीनमधील भारताचे नवे राजदूत असणार आहेत. सध्या बंबवाले हे पाकिस्तानात भारतीय राजदूत म्हणून भूमिका बजावत आहेत. सध्याचे चीनमधले राजदूत विजय गोखले निवृत्त होत असल्याने आता गौतम बंबवाले चीनचे राजदूत म्हणून नियुक्त होतील.
१९८४ च्या आयएफएस बॅचचे अधिकारी असणारे गौतम बंबवाले यांनी यापूर्वी बी़जिंग वकिलातीत काम केलंय. बीजिंगमधल्या भारतीय वकिलातीत डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून त्यांनी काम पाहिलंय. भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमणूक ही महत्त्वपूर्ण मानली जातीय. कोण आहेत गौतम बंबवाले ?
– पुण्याचे गौतम बंबवाले
– १९८४ च्या फॉरेन सर्व्हिस बॅचचे अधिकारी
– सध्या पाकिस्तानात उच्चायुक्त
– १९८५ ते १९९१ दरम्यान बीजिंगमध्ये भारतीय दूतावास उपप्रमुख
– भूतानचे राजदूत म्हणून काम पाहिलं
– जपान, चीन, मंगोलिया, उत्तर कोरियाच्या डेस्कचे प्रमुख
– जर्मनी, अमेरिकेतही कामाचा अनुभव
– सगळ्या देशांचा सखोल अभ्यास