गोयल केंद्रीय मंत्री आहेत की जय शहा यांचे प्रवक्ते?’ असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मांनी विचारले आहेत.
अमित शहांचे पुत्र जय शहांवर झालेल्या आरोपांबद्दल पंतप्रधान मोदी गप्प का?, असा प्रश्न शर्मांनी विचारला.
भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी नितीन गडकरींचा आदर्श घेऊन त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीचा नफा वर्षभरात तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचे वृत्त काल एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. आता जय शहांची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी अमित शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
जय शहा संचालक असलेल्या ‘टेम्पल इंटरप्रायझेस लिमिटेड’ची उलाढाल गेल्या वर्षभरात ५० हजार रुपयांवरुन थेट ८० कोटींवर गेली आहे. याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन जय शहांचा बचाव केला. यावरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘जय शहांच्या बचावासाठी गोयल यांची धावपळ का सुरु होती? गोयल केंद्रीय मंत्री आहेत की जय शहा यांचे प्रवक्ते?’ असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मांनी विचारले आहेत.
अमित शहांचे पुत्र जय शहांवर झालेल्या आरोपांबद्दल पंतप्रधान मोदी गप्प का?, असा प्रश्न शर्मांनी विचारला. ‘याआधी लालकृष्ण अडवाणी, बंगारु लक्ष्मण, नितीन गडकरी भाजपच्या अध्यक्षपदावर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळेच अमित शहांनीदेखील राजीनामा द्यावा,’ अशी मागणी आनंद शर्मांनी केली. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा उल्लेख ‘शहजादा’ असा केला होता. मोदींच्या याच टीकेचा धागा पकडत ‘मोदीजी, जय शहा’जादा’ खा गया. आप चौकीदार थे या भागीदार? कुछ तो बोलिये,’ असा खोचक टोला राहुल गांधींनी लगावला आहे.