Thursday, June 20, 2024
Homeदेशआई ओरडली म्हणून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून आत्महत्या

आई ओरडली म्हणून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून आत्महत्या

हैदराबाद – आई ओरडली या क्षुल्लक कारणामुळे इंजिनीअरिंगमध्ये शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आपल्या आनंदी होण्याची भीती वाटत असल्याचं लिहिलं होतं. घरी कोणी नसताना तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मोनिका असं या तरुणीचं नाव असून ती २१ वर्षांची होती.

तरुणीने आत्महत्या करण्याआधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आत्महत्येचं कारण सांगितलं. ‘या दिवसांमध्ये मला आनंदी राहण्याची भीती वाटू लागली आहे. मला माहित नाही…पण जेव्हा मी माझ्या आयुष्यात आनंदी असते तेव्हा कोणालाच माझ्याकडे लक्ष देण्याची इच्छा नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वाया जात आहे’, असं मोनिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं होतं. यावेळी तिने सॅड स्माईलीदेखील वापरल्या होत्या. दुसरीकडे हैदराबादमध्येच एका व्यक्तीने आधी व्हिडीओ रेकॉर्ड केला, नंतर आत्महत्या केली. रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आपले काही नातेवाईक पैशांसाठी धमकावत असल्याचा आरोप व्यक्तीने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments