Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यतुम्हालाही सतत लघवी येत असेल तर?

तुम्हालाही सतत लघवी येत असेल तर?

जर ऑफिसमध्ये काम करताय आणि वारंवार लघवीला जावे लागले तर ते फार त्रासदायक ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांत वारंवार लघवी लागणे साहजिक आहे. उन्हाळ्यात जास्त पाणी पिल्यामुळे लघवी लागते. परंतु इतर ऋतूंमध्येही जास्त पाणी प्यायले नसाताना वारंवार बाथरुमला जावे लागत असेल तर तुम्हाला खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व वेळीच त्याच्यावर उपचार करुन घेणे तेवढेच महत्वाचे आहे.

वारंवार लघवीचे कारण –
लघवीची पिशवी अधिक सक्रीय होणे
वारंवार लघवीचे कारण आहे लघवीची पिशवी म्हणजे ब्लॅडर अधिक सक्रीय होणे. यामुळे व्यक्तीला सतत लघवीला जावे लागते.
मधुमेह
मधुमेह हे वारंवार लघवी येण्याचे एक कारण आहे. या आजारात व्यक्तीचे शरीर व रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवते.
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

ज्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाले आहे अशा लोकांनाही वारंवार लघवीची समस्या उद्भवते. या परिस्थितीत वारंवार लघवी व जळजळ होते.
किडनीचे संक्रमण
कधी-कधी किडनीत झालेल्या संक्रमणामुळे वारंवार लघवीची समस्या निर्माण होते. अशावेळी दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरकडे जाऊन लगेच चाचणी करून घ्यायला हवी.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments