Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

Winter Hair care,Winter, Hair, careहिवाळ्यात हवा थंड असल्याने केस कोरडे होतात. या कारणामुळे हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी हिवाळ्यात केसांची योग्य निगा कशी राखावी हे जाणून घेऊ या…

१. केस कधीही गरम पाण्याने धुऊ नका. केस धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. तसेच नेहमी सौम्य शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.

२. थंडीत त्वचा आणि केसांमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. आर्द्रतेची कमतरता ही थंडीतली केसांची सर्वात मोठी समस्या असते. त्यामुळे केस कोरडे बनतात आणि म्हणूनच थंडीमध्ये केसांना कंडिशनर लावणे गरजेचे आहे. कंडिशनर लावण्याआधी केसांमधून शाम्पू गेला आहे की नाही हे तपासूनच मग कंडिशनर लावा. मशीनचा वापर करणे टाळा.

३. महिन्यातून एकदा तरी हेअर स्पामध्ये जा.

४. तीन-तीन महिन्यांतून एकदा केस ट्रीम करा. केस ट्रीम केल्याने स्प्लिट एंड्सची समस्या दूर होईल आणि केसाची वाढ होण्यास मदत होईल.

५. हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनिंग मशीनचा वापर टाळा. वापर करायचाच आहे तर आधी केसांना हेअर केअर सिरम लावा, मगच मशीन्सचा वापर करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments