हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे बरीच मंडळी आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणपाणामध्ये बदल करतात. चांगले आरोग्य लाभावे यासाठी काळजी घेतली जातात. हिवाळा चांगला ऋतू असल्यामुळे कोणते अण्ण,पदार्थ,ड्रायफुटर्स,फळे खाल्यानंतर त्याचा फायदा होतो याची सर्वजण काळजी घेतात. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे या दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.
शेंगदाणे स्वस्तही असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात शेंगदाण्यांचे भाव वाढतात. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये १ लीटर दूधाच्या बरोबरीचे प्रोटीन असतात. शेंगदाणे अनेकप्रकारे या दिवसात उपयोगात येतात. त्वचेवरील किटाणूंना नष्ट करण्यात शेंगदाणे मदत करतात. चला जाणून घेऊया आणखी फायदे
हृदयासाठी चांगले –
आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयासंबंधीच्या रोगांची शक्यता पूर्णपणे कमी होते. यासोबतच कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रीत करण्याचे काम यामुळे होते.
हाडांच्या मजबूतीसाठी –
शेंगदाणे खाल्ल्यास हाडांनी मजबूती मिळते. याचं कारण म्हणजे यातील कॅल्शियम आणि व्हिटामिन डी. हा हाडांसाठी एक चांगला आणि स्वस्त इलाज आहे.
हार्मोन्सच्या संतुलनासाठी –
शरिराच्या विविध प्रक्रियांना व्यवस्थित चालवण्यासाठी हार्मोन्सचं संतुलन आवश्यक असतं. रोज शेंगदाणे खाल्ल्याने पुरूषांचे आणि महिलांचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत मिळते.
कॅन्सरच्या उपचारासाठी –
शेंगदाण्यांमध्ये पॉलिफिनॉलीक नावाचं अॅन्टी-ऑक्सिडेंट मिळतं. ते पोट साफ करण्याची क्षमता ठेवतं. २ चमचे शेंगदाण्यामध्ये लोणी घालून एक आठ्वडा सेवन केल्यास कॅन्सरची शक्यता अधिक कमी होते.
प्रजनन क्षमता वाढण्यासाठी –
शेंगदाण्यात फॉलिक अॅसिड असतं. शेंगदाणे गर्भावस्थेदरम्यान भृणमध्ये न्यूरल ट्यूबच्या दोषांना कमी करतं. सोबतच महिलांमध्ये प्रजनन शक्ती अधिक चांगली करते.