Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यकार्यालयाच्या कामसाठी येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास धोक्याचे!

कार्यालयाच्या कामसाठी येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास धोक्याचे!

नवी दिल्ली : जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत असतील, तर तुमच्या आरोग्याला ते धोकादायक ठरू शकतं. एका अभ्यासाअंती संशोधकांनी याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. रॉयल सोसायटी ऑफ पब्लिक हेल्थ रिपोर्टच्या अहवालानुसार, अधिकाधिक लोक आपला वेळ बस, ट्रेन आणि कारमध्ये घालवतात. मात्र, यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रवासात अधिक वेळ गेल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

इंग्लंडमध्ये लांबच्या प्रवासादरम्यान लोक ८०० कॅलरीचे पदार्थ सोबत ठेवतात आणि प्रवासादरम्यान खातात. जर तुम्हीही रोज लांबचा प्रवास करत असाल, तर ही गोष्ट तुमच्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. लांबच्या प्रवासामुळे केवळ तणाव वाढत नाही, तर फिजिकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. अशावेळी बीएमआय आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होते. एवढच नव्हे, तर अधिक वेळ प्रवासात गेल्यास, आरोग्यास हितकारक जेवण करणंही आपसूक कमी होतं. या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. झोपही पूर्ण होत नाही.

रॉयल सोसायटी ऑफ पब्लिक हेल्थने इशारा दिला आहे की, आपण कशाला प्राथमिकता दिली पाहिजे, आपल्या आरोग्याला की ट्रॅव्हल कल्चरला, हे ठरवलं पाहिजे. या अभ्यासात असेही आढळले आहे की, ४४ टक्के लोक प्रवासादरम्यान तणावात असतात. कारण ते आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत. त्याचवेळी ४१ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी करतात. तर काही लोकांची झोप पूर्ण होत नाही, तर काहीजण प्रवासादरम्यान जंकफूड खूप खातात.

सूचना : वरील वृत्त संशोधकांच्या दाव्यानुसार असून, मुंबई माणूस डिजीटल वेब याला दुजोरा देत नाही. त्यामुळे कोणत्याही उपचाराआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments