Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यात कसे राहाल तंदुरुस्त?

हिवाळ्यात कसे राहाल तंदुरुस्त?

आता हळूहळू वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे तुम्हीही आजारी पडण्याची शक्यता आहे. या बदलत्या वातावरणात जर आजारांपासून लांब रहायचं आहे तर हे काही खास उपाय. प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेतच असतो परंतु दुर्लक्ष करुन चालणार नाही. पुढील गोष्टींकडे लक्ष दिल्यास ते स्वत:च्या बचावासाठी योग्य होईल.

@ थंडीमध्ये आपल्या आहारात अश्वगंधा, आवळा, तुळस, त्रिफळा, च्यवनप्राश, इत्यादी औषधी वनस्पतींचा समावेश करा. या औषधी वनस्पतीं आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

@थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराची तेलाने मालिश करा. नंतर गरम पाण्याने अंघोळ करा. गरम पाण्याने अंघोळ करताना पाण्यात मीठ, इलायची, तुळस किंवा मग सुगंधी फुलांच्या तेल मिसळून अंघोळ करा. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

@आयुर्वेदामध्ये शरीराची मालिश रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम मानली जाते. तिळाचे किंवा सूर्यफूलाचे गरम तेल शरीरीच्या स्नायूंना मजबूत होण्यासाठी मदत करते आणि रक्ताभिसरण नियमित होते.

@ जिरे, हळद, धणे, आले आणि काळी मिरी, इत्यादी मसाल्यांचा आहारात समावेश करा. याने सर्दी आणि फ्लू सारखे आजार थांबवण्यासाठी मदत होईल. हे मसाले हानिकारक संसर्गापासून लढण्याची क्षमता वाढवतात.

@थंडीमध्ये गरम आणि हलके जेवण करा. बदलत्या वातावरणामध्ये गरम आणि हलकं जेवण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

@ थंड जेवण आणि ठंड पेय, पदार्थ खाणे टाळा. याने आपल्या शरीरची पचनक्रियेची गती मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.

@ आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे नियमित झोप. थंडीच्या ऋतुत पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. याने शरीराला ताकद मिळते आणि आपण दिवसभर टवटवीत राहतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments