Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यगरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे करा…

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे करा…

 गरोदर महिलांना अनेकदा रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते. अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो. म्हणूनच, गर्भारपणात रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यासाठी हे करा

गर्भारपणात रक्तदाबाची लक्षणे…

हात-पाय सुजणे, हायपरटेन्शन, अधिक प्रमाणत चक्कर येणे, डोकेदुखी, डोळ्यांसमोर अधारी, पोटावरच्या भागात जळजळ किंवा दुखणे, लगवीला कमी होणे किंवा बऱ्याच वेळाने होणे आदी.

रक्तदाबावर असे मिळवा नियंत्रण…

मिठाचे प्रमाण कमी…

गरोदरपणात मिठाचे सेवन कमी करत चला. मिठामुळे रक्तदाब वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी ठेवता येईल तितके ठेवावे.

लसूण…

आहारात लसणाचे सेवन कायम ठेवा. गर्भवती महिलांसाठी लसूण गुणकारी असतो. गरोदरपणात नियमीतपणे २-३ लसूण चाऊन खाल्ल्यास रक्तदाब कमी होतो. तसेच, कंट्रोलमध्येही योतो. सोबत तणाव आणि थकवाही कमी होतो.

व्यायाम…

गर्भावस्थेदरम्यान व्यायाम, योगा नियमीत करण्यानेही रक्तदाब नियंत्रीत राहतो. पण, गर्भावस्थेत व्यायम करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पुरेशी झोप…

गरोदरपणात पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे प्रीएक्‍लेम्‍पशियाचा धोका वाढतो. त्यामुळे धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments