Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यजेवण केल्यानंतर कॅलरीज बर्न करण्यासाठी 'हे' करा

जेवण केल्यानंतर कॅलरीज बर्न करण्यासाठी ‘हे’ करा

Calories Burnजेवनानंतर आपण चालत नाही एकाच ठिकाणी बसून राहतो. कार्यालयात काम करत असतांना जेवनानंतर लगेचच कामात गुतंतो. त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. परिणामी शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज जमा होऊ लागतात आणि एकदा वजन वाढले ते कमी करणे कठीण जाते. म्हणूनच कॅलरीजवर कंट्रोल करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत.

जेवनानंतर चालणे आवश्यक…

भरपेट जेवनानंतर सगळ्या कॅलरीज बर्न करण्याचा सोपा उपाय म्हणजे चालणे. जेवणानंतर १५-२० मिनिटे वॉक घेतल्यास कॅलरीज बर्न होतील. जेवणानंतर पाय मोकळे करायला घरच्यांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत नक्कीच उतरू शकता. वॉक केल्याने जेवण पचायला सोपे जाते. लक्षात घ्या हा वॉक आरामात करा. वेगाने चालणे टाळा. कॅलरीज नक्कीच बर्न होतील.

इनडोअर एक्झरसाइज आवश्य करा…

लग्नाला किंवा फंक्शनला रोजचे शेड्यूल बिघडते. त्यामुळे इनडोअर एक्झरसाइज करावी. सकाळी, दुपारी किंवा रात्री जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे वेळ ठरवा आणि हा इनडोअर व्यायाम करा. लक्षात ठेवा की, या व्यायामाच्या आणि जेवणाच्या मध्ये किमान एक तासाचा ब्रेक असावा. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका. इनडोअर व्यायामात जम्पिंग जॅक, पुश अप्स, प्लँक, सिट अप्स आणि स्क्वाट्सही करू शकता. पण आठवणीने ठरवलेल्या वेळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे हळूहळू स्टॅमिनाही वाढेल. यासोबतच लिफ्टऐवजी पायऱ्यांनी चढा, सायकलिंग करा किंवा वॉकसारख्या अॅक्टिव्हिटीजही करू शकता.

गोड खाण्यावर नियंत्रण…

लग्न आणि सणावाराला आवर्जून गोड खाल्ले जाते. जे टाळणेही अशक्य असते. पण यातही पर्यायाने कमी गोड मिठाई किंवा तुपाऐवजी प्रोटीन लाडू निवडू शकता. यामुळे कॅलरीजही कमी होतील आणि प्रोटीनही मिळेल. दुसऱ्यांना गिफ्ट देतानाही प्रोटीन चॉकलेट आणि कुकीज गिफ्ट करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

पाणी भरपूर प्या…

आपल्या शरीरात सर्वात अधिक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे त्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक आहे. आपली पाणी पिण्याची पद्धत आपल्या वजन नियंत्रित ठेवते. बरेचदा लोक जेवल्यानंतर भरपूर पाणी पितात. यामुळे जठराग्नी शांत होतो. त्यामुळे जेवण नीट पचत नाही. जेवणाआधी किमान ३० मिनिटे पाणी प्यावे किंवा जेवणानंतर ३०-४५ मिनिटांनी प्यावे. यामुळे जेवण नीट पचते. तसेच शरीराला पोषक तत्त्वांचे शोषण करण्यासही आवश्यक वेळ मिळतो. एक्झरसाइज आधी आणि नंतर थोडंथोडं पाणी प्यावं. यामुळे शरीर हायड्रेट राहतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments