Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यझोपण्यापूर्वी दूध पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

झोपण्यापूर्वी दूध पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

दूध हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लहान बाळासाठी पूर्णान्न असलेले दूध आपण वेगवेगळ्या मोठे झालो तरीही पितो. काहींना दूध अजिबात आवडत नाही तर काहींना खूप जास्त आवडते. पण कॅल्शियम आणि प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले दूध आहारात असायलाच हवे. आवडत नसले तरीही औषध म्हणून का होईना दूध प्यायला हवे असे अनेक डॉक्टरही सांगतातपण दुधात कार्बोहायड्रेट्स, फॅट्सबरोबरच ए, बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-६, बी-१२, सी, इ, के, डी ही जीवनसत्वेसुध्दा मुबलक असतात. याशिवाय आयर्न, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबे, पोटॅशियम, सेलेनियम, झिंक, फॉस्फरस ही खनिजे उत्तम प्रमाणात उपलब्ध असतात. एक कप शुध्द दूध प्यायल्यावर आपल्या शरीराला साधारणतः १४० कॅलरीज मिळतात. सुदृढ प्रकृतीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यासाठी, हाडे बळकट होण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आरोग्य उत्तम राहायला दुधासारखा दुसरा पर्याय नाही.

आता हे दूध रात्री प्यावे की सकाळी, गार प्यावे की गरम, त्यामध्ये काही घालावे की न घालता प्यावे असे अनेक प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात. त्याबाबत बरीच मतमतांतरेही आहेत. पण अविनव वर्मा यांच्या म्हणण्यानुसार रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायले तर ते आरोग्यासाठी अधिक फायद्याचे असते. शरीराचे कार्य सुरळीत व्हायचे असले तर रात्री झोपताना दूध प्यायलेले चांगले असते. तसेच कोमट दूध प्यायल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. पाहूयात रात्री झोपताना दूध पिण्याचे फायदे…

१. वजन कमी करण्यास उपयुक्त

रात्री झोपताना दूध प्यायले तर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास रात्री झोपताना दूध पिणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. प्रक्रिया केलेले दूध पिणे जास्त चांगले. मात्र झोपताना दूध पित असाल तर ते एक ग्लासहून जास्त नसेल याची काळजी घ्या.

२. पुरेशी झोप येण्यास उपयुक्त

कोमट दूध प्यायल्याने शरीरातील स्नायू शिथिल होण्यास मदत होते. स्नायू शिथिल झाले की शांत आणि चांगली झोप लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे गाढ झोप लागण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येत नसेल तर दूध प्या, नक्कीच फायदा होईल.

३. हृदयरोगाची शक्यता कमी

दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित राहील्यास हृदयावर ताण येत नाही आणि हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवण्यापासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले रहावे यासाठी झोपताना दूध प्यायलेले फायदेशीर ठरते.

४. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदतशीर

आयुर्वेदाप्रमाणे दूधामध्ये हळद किंवा आले टाकून प्यायल्यास त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. विविध कारणांनी होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी हे उपयोगी ठरते. शक्यतो हे दूध कोमट असेल याची काळजी घ्यावी. तसेच आपण पित असलेले दूध कमी फॅटस असलेले असेल असे पहावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments