Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यएड्स आणि जागरुकता!

एड्स आणि जागरुकता!

आज १ डिसेंबर एड्स दिवस निमित्त जागरूकतेला समर्पित आहे. एड्स बद्दल विविध चर्चज्ञ रंगतील.ज्यांनी या आजाराशी मुकाबला केला तो भयावहच असतो. काही भेदभाव न करण्याचे आवाहन केले जातील आणि भेदभाव न करणे हे तितकेच सत्य आहे. परंतु प्रत्येकाने एड्स होणार नाही याची दक्षता घेणे प्रत्येकाची जवाबदारी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, २०१६ च्या अखेरीस सुमारे ३.५ कोटी जण या आजाराशी लढत आहे.

जाराबद्दल अज्ञान 

संशोधनातून असे समोर आले की, अनेकजण अजूनही एड्सविषयी अज्ञान बाळगून आहेत. आपल्याला एड्ससारख्या गंभीर आजाराची लागण झाल्याचे अनेकांना माहितही नसते. जेवढी माहिती असणे गरजेचे आहे ती नसल्याचे वारंवार समोर येत आहे. एचआयव्ही शरीरात दाखल झाल्यानंतर शरीरातील प्रतिकार शक्ती हळूहळू कमी करतो. शरीरावर वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शन परिणाम करु लागतात. एचआयव्ही पॉझिटीव्ह असण्याच्या साधारण ८ ते १० वर्षांनी या वेगवेगळ्या आजारांची लक्षणे दिसायला सुरूवात होते.

ही लक्षणे असतील तर चाचणी करा… 

जर एखाद्याला खालील लक्षणे एका महिन्यापेक्षा अधिक काळ होत असतील तर त्यांनी एचआयव्ही टेस्ट करणे गरजेचे आहे.

१) कोणत्याही कारणाविना आलेला ताप.

२) कोणत्याही कारणाविना अतिसार.

३) सतत कोरडा खोकला.

४)  तोंडात पांढऱ्या फोडासारखे निशाण.

५) कोणत्याही कारणाविना थकल्यासारखे वाटणे आणि जलद गतीने वजन कमी होणे.

६) स्मरणशक्ती कमी होणे, तणावात जाणे.

ही सर्व लक्षणे सामान्य आजारांमध्येही असतात, त्यामूळे घाबरण्याचे कारण नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments