Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यात मौजमजेला जातांना काळजी घ्या!

हिवाळ्यात मौजमजेला जातांना काळजी घ्या!

डिसेंबरमध्ये थंडीही चांगलीच वाढलेली असते. या काळात फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठया प्रमाणात असते. परंतु  फिरतांना तब्येत बिघडली, सर्दी-डोकेदुखी सुरु झाली की रसभंग होतो. म्हणूनच हिवाळ्यात मौजमजा करतांना हे लक्षात ठेवाव्यात.

हिवाळ्यात फिरतांना हे लक्षात ठेवा!
१. हिवाळ्यात फिरण्यासाठी जात असतांना ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात, तिथे तापमान किती कमी होतं, याची थोडीशी माहिती आधीच करून घ्या. त्यानुसार पुरतील असे शॉल, स्वेटर आणि थर्मल्स असे कपडे सोबत ठेवा.
२. टॉवेल आणि मोज्यांचे जास्ती जोड घ्यायला विसरु नका. हिवाळ्यात रोजच्या वापरातल्या या गोष्टी लवकर सुकत नाहीत. त्यामुळे दोनपेक्षा अधिक जोड घेतले तर काळजीचं कारण उरत नाही. ओले किंवा मळकेच कपडेही घालवे लागत नाहीत.
३. सामानात हळद जरुर ठेवा. हवेत अचानक बदल झाला की अनेकांना लगेचच सर्दीचा त्रास सुरु होतो. अशावेळी थोडीशी हळद तुमच्यासोबत असू द्या. थंडीपासून वाचण्यासाठी हे आयुर्वैदिक औषध एकदम रामबाण उपाय आहे. हळद उष्ण असल्यानं ती दुधासोबत घेणं अशावेळी फायदेशीर ठरतं.
४. बर्फाळ प्रदेशात स्नो फॉल पाहण्यासाठी जाणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्या. बर्फावर जास्त काळ चालू नका. त्यामुळे स्नायू बधीर होऊन त्रास होण्याची शक्यता असते.
५. प्रवासात इकडचं तिकडचं पाणी पिऊन सर्दी, घसा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी शक्य असेल तिथे गरम पाणीच प्या. शिवाय सोबत एखादी गरम पाण्याची बाटलीही जरु र ठेवा.
६. प्रवास बसने असेल किंवा रेल्वेने. जास्त वेळ खिडकी उघडी ठेवू नका. कारण थंड हवेचा झोत थेट शरीरावर येत राहिल्यास शरीर आखडून जातं.
७. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे सोबत विंटर केअर लोशन, लिप बाम, तेलाची छोटी बाटली असू द्या.

८. अधूनमधून स्नायू ताण देऊन मोकळे करा. जेव्हा प्रवास लांबचा असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून करण्याची गरज असते. गाडीतून थोड्या वेळासाठी जरी उतरलात तरी शरीराचे स्नायू एकदम ताण देऊन मोकळे करा. कारण त्यामुळे शरीरात रक्त गोठून, स्नायू आखडत नाहीत. म्हणजे प्रवासानं जाम व्हायला होत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments