Saturday, October 12, 2024
Homeआरोग्यदात घासतांना घ्यावयाची काळजी

दात घासतांना घ्यावयाची काळजी

सगळ्यात मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे,तोंडाला येणारी दुर्गंधी. समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.” आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात.

आपले पूर्वज खैर, करंज, वड, उंबर, पिंपळ, कडूनिंब, बाभूळ, वगैरे झाडाची लहानशी काडी घेऊन ती चावूनचावून अधिक मृदु करुन त्याने आपले दात व हिरड्या साफ करायचे. कडू-तिखट व तुरट चवीच्या या वनस्पती आपल्या गुणांनीच तोंडामधील घातक रोगजंतुंचा नाश करायाच्या, हिरड्या सुदृढ करायच्या व दातांवरील इनॅमलला मजबूत ठेवायच्या. कडू-तिखट-तुरट चवीच्या त्या वनस्पतींची वास्तवात आजच्या स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या आजच्या समाजाला अधिक गरज आहे. मात्र पुढे त्या झाडाच्या काडीची जागा ब्रशने घेतली . त्या ब्रशने दातांच्या फटींमध्ये अडकलेले कण सहज काढता येतात ,हे खरे. मग त्या ब्रशवर एखादे लोण्यासारखे मऊ क्रिम असले तर ब्रशने घासताना दात व हिरड्यांना इजा होणार नाही व दात घासणे सोपे जाईल या हेतूने पेस्ट आली. मग त्या टुथपेस्टमध्ये वेगवेगळी केमिकल्स मिसळली गेली. ज्यांचे फायदे कमी आणि तोटे जास्त असल्याचे पुढे पुढे लक्षात आले.

दात घासताना ब्रश दातांवरुन आडवा न फिरवता उभा ( वर-खाली) हळुवारपणे फिरवा. त्याशिवाय ब्रश दातांवरुन गोलाकार गतिने हळूवार फिरवणे, दातांच्या फटींच्या कडेने दात वर-खाली घासणे, दातांच्या फटींमधील अन्नाचे कण ब्रशच्या केसांनी प्रयत्नपुर्वक हळुवारपणे काढणे अशाप्रकारे दात घासायला हवे. दातांच्या चारही कोप-यातून ब्रश व्यवस्थित फिरवा. वरच्या रांगेतले मागचे दात व अगदी कोप-यातल्‍या दात आणियांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सकाळी व रात्री झोपण्यापुर्वी दात घासलेच पाहिजेत, तर मुलांनी सायंकाळीसुद्धा घासणे योग्य. महत्त्वाचं म्हणजे ब्रश दातांवर जोरात दाबू नका, अलगद फिरवा आणि हो, मऊ केसांचा ब्रश वापरा. टुथपेस्टमधील केमिकल्सचे प्रमाण पाहता अगदी वाटाण्याच्या आकाराऐवढीच पेस्ट ब्रशवर घ्या, केमिकल्सविरहित वापरलीत तर उत्तम, पण दात नीट घासा आणि व्यवस्थित चूळा भरा.

रात्री झोपताना त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या करा. आठवड्यातून निदान एकदा कडुनिंबाची काडी चघळण्याची सवय लावा. इतकं केलंत तरी तुमचे दात आणि मौखिक आरोग्य तर सुधारेलच.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments