Sunday, September 15, 2024
Homeआरोग्यकेसातील कोंड्याचा त्रास संसर्गजन्य असतो का ?

केसातील कोंड्याचा त्रास संसर्गजन्य असतो का ?

मुंबई : अनेकांना केसात कोंड्याचा त्रास जाणवतो. केसांवर किंवा कपड्यांवर पडणारा कोंडा चारचौघात तुम्हांला खजील करणारा असतो. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा रूम मेटला कोंड्याचा त्रास असेल तर तो तुम्हांलाही संसर्गाने होऊ शकतो असे काहींना वाटते. पण खरंच कोंड्याचा त्रास संसर्गजन्य असतो का ? याबाबतचा खास सल्ला.

टाळूवर एका प्रकारच्या यीस्ट इंफेक्शनमुळे कोंड्याचा त्रास होतो. जसे हे इंफेक्शन वाढते तसा त्रासही वाढतो. परिणामी कोंड्याचा त्रास वाढत जातो. पण म्हणून कोंड्याचा त्रास हा संसर्गजन्य असतो असा समज करून घेणं चुकीचे आहे.  तुम्हांला कोंड्याचा त्रास जाणवल्यास त्यावर उपाय करा किंवा तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये काही बदल करा.

टाळूजवळील भाग खूपच शुष्क जाणवत असल्यास खोबरेल तेलाने मसाज करा. यामुळे टाळूजवळील त्वचा मॉईश्चराईज्ड राहण्यास मदत होते. खोबरेल तेलासोबत एरंडेल तेल मिसळल्यास केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.

आठवड्यातून दोनदा केस नियमित स्वच्छ धुवावेत. पावसात भिजल्यास केस स्वच्छ धुवा त्याला कंडीशनर लावा. पावसाच्या पाण्यामुळे केसांचे नुकसान होण्याचे तसेच इंफेक्शन वाढण्याची भीती असते.  ब्लो ड्रायरऐवजी टॉवेलने केस स्वच्छ कोरडे करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments