कधीही काहीही आजार झाला की,आपण टेंनशन मध्ये येतो. परंतु त्याच्यावर सहजपणे आपल्याला मात करता येते. फक्त त्याबद्दल छोट्या टीप्स असतात. त्याची माहिती आपल्याला हवी. आहारात सहज उपलब्ध होणारे काही पदार्थ बऱ्याच आजारांवर गुणकारी असतात.तर काही गोष्टी आपल्याला टाळाव्याही लागतात.
० गव्हाच्या दाण्याच्या आकाराएवढा चुना उसाच्या रसात मिसळून प्यायल्याने कावीळ लवकर बरी होते.
० ज्येष्ठमध चावून त्याचा रस चोखल्याने घशाचे विकार बरे होतात आणि आवाजही सुधारतो.
०दूध आणि मीठ असा विरुद्ध आहार करू नये. त्याचे त्वचेवर दुष्परिणाम होतात.
० आहारात सैंधव मिठाचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यानंतर काळ्या मिठाचे स्थान आहे. पांढरे मीठ मात्र विषासमान असते.
०तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने कधीही हिवतापाची बाधा होत नाही.
० घराबाहेर पडण्यापूर्वी सूर्यफुलाच्या बियांची पूड खायची. यामुळे दारू प्यायची इच्छाच नाहीशी होते.