सर्वाधिक वादग्रस्त ‘बिग बॉस’ या शोची पूर्व स्पर्धक असलेल्या एली अवरामने नुकतेच फोटोशूट केले आहे. यातील काही फोटोज् एलीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहे. एली बिग बॉसच्या सीजन-७ मध्ये झळकली होती. यावेळी ती शोचा होस्ट सलमान खान याची फेव्हरेट स्पर्धक होती. आता तिची गणती सलमान खानच्या क्लोज मित्रांपैकी केली जाते. एली सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, नेहमीच ती तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असते.
एली अवराम हॉलिवूड अभिनेत्री मारिया ग्रांलंदची मुलगी आहे. स्वीडिश ग्रीक निवाशी एलीने ‘मिकी वायरस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात तिच्या अपोझिट टीव्ही होस्ट मनीष पॉल बघावयास मिळाला होता. मात्र या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही.
पुढे तिने ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटात स्टॅडअप कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या लेडी लवची भूमिका साकारली. तिचा हा चित्रपटही बॉक्स आॅफिसवर फार काही करू शकला नाही.
एलीने तिच्या अभिनयाची सुरुवात स्वीडनमधून केली होती. तिचा पहिला स्वीडिश चित्रपट एक क्राइम रोमान्स ड्रामा होता. पुढे २०१२ मध्ये ती भारतात शिफ्ट झाली. खरं तर बिग बॉसनंतरच तिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचे ठरविले होते.