skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा ५ मार्चपासून

सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा ५ मार्चपासून

मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या मुख्य लेखी परीक्षा ५ मार्चपासून सुरू होणार आहेत. आज सीबीएसईकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

सीबीएसईच्या दहावीची परीक्षा ही ५ मार्चला सुरू होऊन ती ५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या परीक्षेत  एकूण ९५ हुन अधिक विषयांच्या पेपरची परीक्षा होईल. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू आदी भाषांसह फेंच, जर्मन आदी भाषा विषयांच्या पेपरचा समावेश आहे. त्यासोबत  सीबीएसईकडून खास शिकवण्यात येणाऱ्या चित्रकला या विषयाचा पेपर अखेरच्या दिवशी ठेवण्यात आला आहे. या परीक्षेला देशभरातून सुमारे १७ लाखांच्या दरम्यान विद्यार्थी बसणार असल्याची माहिती सीबीएसईच्या मुख्य प्रसिद्धी प्रमुख रमा शर्मा यांनी दिली.
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा ही ५ मार्चलाच सुरू होणार असून ती १२ एप्रिलपर्यंत चालेल. यात १६९ पेपरची परीक्षा घेतली जाईल. यासंदर्भात मंडळाने आपल्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रालाही त्यासाठीची माहिती देण्यात आली, असे देखील शर्मा म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments