skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण: कर्नल पुरोहितसह अन्य तीन आरोपींवरील मोक्का हटविला

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण: कर्नल पुरोहितसह अन्य तीन आरोपींवरील मोक्का हटविला

मुंबई – राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने आज मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, अजय रहिरकर आणि रमेश उपाध्याय यांच्यावरील मोक्का हटवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १५ जानेवारी रोजी होणार आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोट  प्रकरणातील या आरोपींची यापूर्वीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यात न्यायालयाच्या या निर्णयामुळे या आरोपींना दिलासा मिळाला आहे. २००८ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी रमेश उपाध्याय आणि अजय रहीकर यांच्या वरील मोक्का हटवण्यात आला. यूएपीए कलम १७, २० आणि १३ हटवण्यात आले आहे. तसंच कोर्टाने शिव नारायण कालसांगरा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटका केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जानेवारी असणार आहे.

याआधी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञा आणि  ऑगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला होता. पुरोहित नऊ वर्ष तुरुंगात राहिले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी स्पेशल मोक्का कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंह आणि पुरोहित यांच्या अन्य नऊ जणांवर चुकीच्या पद्धतीने मोक्का लावण्यात आला आहे असं नमूद केले. तसंच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रसाद पुरोहित यांच्यासह समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी यांच्यावरचाही मोक्का हटवला.  मालेगाव बॉम्बस्फोटामधील सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन वाढवला आहे. आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहीत या दोघांवर गुन्हेगारी कट रचणे, ३०२ खुनाचा गुन्हा या अंतर्गत खटला चालणार आहे. तसंच १२० ब, ३०२, ३०७, ३०४, ३२६, ४२७, १५३अ आयपीसी आणि कलम १८ अंतर्गतही खटले चालणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments