skip to content
Sunday, May 19, 2024
Homeदेशकाँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

गांधी यांच्या व्यतीरिक्त इतर कोणत्याही कार्यकर्त्याचा नेत्याचा अर्ज आला नाही तर गांधी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात येईल. मात्र ही निवडणूक बिनविरोध होती की अजून काही अर्ज भरले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments