Placeholder canvas
Monday, May 13, 2024
Homeकोंकणठाणेठाणे शहरात भारतीय जनता पार्टीला खिंडार

ठाणे शहरात भारतीय जनता पार्टीला खिंडार

ठाणे: भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर परिसरातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षांतर करत असल्याच चित्र आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे  ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस आणि नौपाडा विभागातील कुशल संघटक भावेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हेमंत दळवी नौपाडा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष,सागर वाघेरे सरचिटणीस नौपाडा मंडळ ,दिनेश दळवी  सचिव नौपाडा मंडळ ,सनी चौलकर सदस्य नौपाडा मंडळ यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला . या प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश पायरे  महिला आघाडी विभाग संघटक शर्मिला नेवाळकर उपास्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments