skip to content
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमानखुर्दमधील मंडल परिसरात भीषण आग

मानखुर्दमधील मंडल परिसरात भीषण आग

मुंबई: मानखुर्दमधील मंडल परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास १९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आग लागली आहे त्या ठिकाणच्या परिसरात लाकडाच्या वखारींसह अन्य छोट्या-मोठ्या कंपन्या असून, आसपासच्या परिसरात वस्ती देखील आहे. वस्ती दाट असल्याने ही आग अधिकच भडकत असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, परिसरात धुरांचे मोठाले लोट आकाशाकडे जाताना दिसत आहेत. परिसरात सर्वत्र धुराचे वातावरण तयार झालेले आहे. ही आग येथील कुर्ला स्क्रॅप यार्डमध्ये लागली आहे. ज्या ठिकाणी आग लागली तिथं मोठ्याप्रमाणावर लाकडी सामान ठेवल्या जातं.  दुपारीअडीच वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, यानंतर धुरांचे लोट बाहेर येऊ लागल्याने स्थानिकांनी तत्काळ अग्निशामक विभागास याबाबत माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments