भोपाल : राजस्थानमध्ये हलविण्यात आलेल्या काँग्रेसच्या ८२ आमदरांना आज पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले आहे. सोमवारी फ्लोअर टेस्टपूर्वी या आमदारांची कोराना टेस्ट होणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
जयपूर येथून आमच्या आमदारांची वैद्यकीय चाचणी करावी अशी चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली आहे. अशी माहिती कमलनाथ सरकारमधील मंत्री पीसी शर्मा यांनी दिली. सोमवारी बहुमत चाचणी आधी या आमदारांची कोरोनाबाबतची तपासणी केली जाणार आहे. हरियाणा तसेच बंगळुरुमध्ये गेलेल्या आमदारांची सुध्दा तपासणी केली जाणार असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं.
#MadhyaPradesh Congress MLAs who arrived in Bhopal from Jaipur earlier today, shift to Courtyard by Marriott hotel in Bhopal. Party’s Kantilal Bhuria says, “We have more than 112 MLAs with us.” pic.twitter.com/yC2ssqWKUD
— ANI (@ANI) March 15, 2020
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कमलनाथ सरकारसमोरी अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी कमलनाथ सरकारची अग्निपरिक्षा होणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा मध्यप्रदेश सरकारकडे लागल्या आहेत.