Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशकोरोनाविषयीची एका फोनवर माहिती; हेल्पलाईन नंबर

कोरोनाविषयीची एका फोनवर माहिती; हेल्पलाईन नंबर

Coronavirus Help line numbers, coronavirus, help line numbers, corona, covid-19नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. या आजारावर ताबा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्याचे हेल्पलाईन नंबर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता केंद्र सरकारने कोविड-१९ ला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. तर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोरोना संकटावर चर्चा करतील.

 

राज्य सरकारकडून कठोर निर्णय

कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा धोका वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये यासाठी राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तर मुंबईतही कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तसेच, राज्यातील शाळास कॉलेज, जिम, मॉल, चित्रपट गृह हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments