Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन – चंद्रकांत देशपांडेचा ‘एबी आणि सीडी’चा याराना

अमिताभ बच्चन – चंद्रकांत देशपांडेचा ‘एबी आणि सीडी’चा याराना

तुमच्या आजोबांचे वर्गमित्र हे अमिताभ बच्चन असतील तर…’ तर काय? सगळीकडे नुसता आनंदाचा गोंधळ उडेल, कुटुंबातील सदस्यांचे, मित्र परिवारांकडून सतत कुतूहलाचे प्रश्न उपस्थित होतील. ‘तुमच्या मैत्रीचे, शाळेतील किस्से सांगा’, ‘अमिताभजी शाळेत असताना कसे होते’, ‘कसे वागायचे’, ‘नेमके काय बोलायचे’ यांसारखे अनेक शंभर प्रश्न तुमच्या आजोंबाना विचारले जातील. असंच काहीसं घडलंय ‘एबी आणि सीडी’ या सिनेमातील ‘चंद्रकांत देशपांडे’ यांच्या बाबतीत.

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. आपल्या हक्काची आणि तितकीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेणा-या व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असं प्रत्येक नातवाला वाटत असतं आणि ते तितकंच खरंही असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती या अडचण वाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखले, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी ‘एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

चंदू मी आलोयहा डायलॉग उत्सुकता वाढवणार…

‘एबी आणि सीडी’च्या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि ‘आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रं, तसेच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकार, पण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: ‘आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य आणि अमिताभजींच्या दमदार आवाजातील ‘चंदू मी आलोय’ हा डायलॉग’….या सर्व गोष्टी प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात शंका नाही.

अमिताभजींनी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या आणि सिनेरसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यामुळेच ‘अमिताभ बच्चन’ म्हटलं की सर्वप्रथम कुतुहल वाटतं आणि जर अमिताभजी तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर बातच निराळी होऊन जाते.

अमिताभ बच्चनसह विक्रम गोखलेंची मुख्य भूमिका…

अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ मध्ये अमिताभजी बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments