Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमाजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आयसीयूत

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आयसीयूत

पुणे: माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी अंगणात फेरफटका मारताना भोवळ येऊन पडल्यानं गंभीर जखमी झाले. अरूण शौरींना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयू विभागात ठेवण्यात आलं असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.

अरूण शौरी लवासा सिटीमधील घराच्या अंगणात फिरताना काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास शौरी यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यामुळं त्यांच्या मेंदूला आणि डोक्याला इजा झाली आहे. काल रात्री दहा वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सुरुवातीला त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. डोक्याला मार लागल्यामुळे सध्या आयसीयूत आहेत. त्यांच्या भेटीसाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी,लेखक,कवी यांची रिघ लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments