जळगाव: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करु नये. पुराव्यानिशी पूर्ण अभ्यास करून सरकारवर आरोप केले पाहिजेत. तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला अधिक महत्त्व राहिलं. असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना दिला.
माझं विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलं. तसेच माझ्या कामाची आठवण करून दिली. त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस देखील यापेक्षा उत्तम काम करतील अशी मला आशा आहे.
भाजपचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत यात सरकारवर केवळ प्रसिद्धीसाठी आरोप न करण्याच्या सल्ल्याचाही समावेश आहे. विधीमंडळातील अधिवेशनात अनेक नेत्यांनी एकनाथ खडसे यांची आठवण काढली. त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.