Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्र'हम बुरे ही ठीक है...; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं!

‘हम बुरे ही ठीक है…; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं!

'We are just fine...; Sanjay Raut troll BJP!
मुंबई : विधानसभा निकाल लागल्यापासून शिवसेनेची बाजू रोखठोख मांडणारे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत निकालानंतर दररोज पत्रकार परिषद, अग्रलेख आणि टि्वटरच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल करत आहेत.

संजय राऊत यांनी आज सकाळीच एक ट्वीट करुन पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला हवं असलेलं मुख्यमंत्रीपद भाजप देण्यास तयार नसल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता भाजपने शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. अशावेळी आता संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आपल्या ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले टि्वटमध्ये…

‘हम बुरे ही ठीक हैं, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था..!!’ असं ट्वीट करुन त्यांनी
भाजपवरच एकप्रकारे निशाणा साधला आहे. भाजपकडून कशाप्रकारे उत्तर दिलं जात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments