Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यस्लिम फिगरसाठी 'हे' करुन बघा !

स्लिम फिगरसाठी ‘हे’ करुन बघा !

Try 'This' for Slim Figure!
सकाळी उठताच उपाशीपोटी कोमट पाणी प्या. शरीरातील विषाक्त पदार्थ दूर होतील. तुमचा मेटॅबॉलिझम रेट सुधारेल वजन कमी होईल. पाणी पिण्याची ही पद्धत हृदयाला निरोगी ठेवण्यात सहायक ठरते.

ब्रश केल्यानंतर एक ग्लास पाणी प्या. ब्रश केल्याच्या अर्धा तास किंवा ४५ मिनिटानंतरही पाणी पिऊ शकता. याने पचनक्रिया चांगली राहते. पाणी पिल्याच्या अर्ध्या तासानंतरच काहीतरी खावे. पाणी वेगाने पिऊ नये.

जेवणानंतर पाणी पिऊ नका. जेवण करण्याच्या एक तास आधी पाणी प्यावे आणि जेवण झाल्याच्या दोन तासांपर्यंत पाणी पिऊ नये. यामुळे मेटॅबॉलिझम वाढतो आणि वजन कमी करण्यातही भरपूर मदत मिळते.

पाणी हळूहळू प्यावे. एक ग्लास पाणी पिण्याच्या अर्ध्या तासानंतरच दुसरा ग्लास पाणी प्यावे. तुम्ही घाई-घाईत पाणी पीत असाल तर त्याचा पचनक्रिया आणि भुकेवर परिणाम होतो.

उभं राहून पाणी पिल्याने शरीराचे लिक्विड बॅलन्स बिघडते. यामुळे शरीराच्या सांध्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. संधिवाताचा त्रास होऊ शकतो. उभे राहून पाणी पिणे टाळावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments