Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिककुत्र्याला वाचवितांना गायिकेचा अपघाती मृत्यू

कुत्र्याला वाचवितांना गायिकेचा अपघाती मृत्यू

नाशिक : गायिका गीता माळी मुंबईहून नाशिक महामार्गावरुन कारने नाशिकला जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या गाडीसमोर कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एचपी गॅसच्या टँकरला धडकली. यामध्ये गीता माळींचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले.
मुंबई-नाशिक महामार्गावरील एकता हॉटेलसमोर ही घटना घडली. या भीषण अपघातात गीता माळीचे पती विजय माळीही जखमी झाले आहेत. गीता माळी गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेत गेल्या होत्या. अमेरिकेहून त्या मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या कारने नाशिकला येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments