बीड : बीडमध्ये सोमवारी सकाळी बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातात मृत्यू झालेले ऊसतोड मजूर असून ते जावयाच्या दारुचे व्यसन सोडवण्यासाठी जात होते. मृतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे ही दुर्दैवी घटना घडली.
ट्रकमध्ये असलेले सर्व कामगार हे ऊस तोड मजूर होते. हे सर्वजण दारुचे व्यसन सोडवण्यासाठी निवडुंगवाडीला जात होते. त्याचवेळी हा अपघात घडला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण जावयाच्या दारुचे व्यसन सोडवण्यासाठी जात होते. मृत झालेले सर्व हे एकाच गावातील रहिवाशी आहे. मृतांमध्ये सासरे आणि जावयासह नातेवाईकांचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.