Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रयुती टिकणार की तुटणार ? ; आज फैसला !

युती टिकणार की तुटणार ? ; आज फैसला !

शिवसेना, भाजपामध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तरी सुध्दा युतीमध्ये ताळमेळ बसला नाही. भाजपा अध्यक्ष,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत असून ते तोडगा काढतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज तोडगा निघाला नाही तर युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपा अध्यक्ष तथा गृहमंत्री आज विविध कार्यक्रमांसाठी मुंबईत दाखल झालेले आहेत. अमित शाह हे मातोश्रीवर जाऊन शिवसेना पश्रप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि युतीच्या जागासंदर्भात तोडगा काढतील अशी चर्चा आहे. मात्र शाह हे मातोश्रीवर जाणार आहे किंवा नाही यावर अद्यापही दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे युतीचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

युती बाबत लोकसभेतचं ठरलं होत असं दोन्ही पक्षांचे नेते बोलतं आहेत, मात्र उमेदवारांची यादी का जाहीर करत नाहीत. कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे युती बाबत साशंकता निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवार संभ्रमात आहेत. त्यामुळे सध्यातरी युतीचं कायं होणार हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. युती टिकणार की तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments