Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

maharashtra election 2019
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काल घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारांना 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. दोन्ही राज्यांचा 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. हरियाणामधील 90 आणि महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याबरोबरच देशात 65 ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 1.8 लाख मतदान यंत्रे आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष निरीक्षकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले. नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती.

 २०१४ रोजी विधानसभेसाठीच्या जागा व निकाल

2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच टप्प्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या.

चारच दिवसानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments