Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईइशारा : मुंबईसह राज्यभरात तीन दिवस अतिवृष्टी

इशारा : मुंबईसह राज्यभरात तीन दिवस अतिवृष्टी

मुंबई : मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रासह राज्यभरात 18 ते 20 सप्टेंबर तीन दिवस अतिवृष्टी होईल. असा इशारा हवामान खात्यानं दिला. आज पहाटेपासून मुंबईसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

सोमवारी रात्रीपासूनच भिवंडी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक दुकांनांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. तसंच बाजारपेठांमध्येही पाणी शिरल्याने अनेक व्यापाऱ्यांचेही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबई परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तर नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरातही पावसाची रिमझिम सुरू आहे. तर रायगडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ठाणे, कल्याण, पनवेलच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसधार स्वरूपाचा पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments