Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआरे बाबत आज उच्च न्यायालयात फैसला

आरे बाबत आज उच्च न्यायालयात फैसला

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ मार्गावरील ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्याला सर्व स्तरातून विरोध सुरु आहे. मात्र आज, मंगळवारी या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दोन हजार १८५ झाडे तोडण्यास आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यास मंजुरी देण्याच्या मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्याविषयी खंडपीठ सुनावणी घेणार आहे. मात्र, त्याचबरोबर आरे कॉलनी हा वन परिसरात मोडतो की नाही, आरे कॉलनीचे अधिकृत सीमांकन झालेले आहे की नाही, आरे कॉलनीचा संबंधित परिसर ‘ना विकास’ क्षेत्रात मोडतो का, अशा विविध प्रश्नांविषयीच्या अन्य याचिकांचारही खंडपीठ यावेळी विचार करणार आहे. त्यादृष्टीने खंडपीठाने संबंधित सर्व याचिका एकत्रित सुनावणीस ठेवल्या आहेत.

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची आरे भेट

माजी केंद्रीय मंत्री व वन आणि पर्यावरण विभागाचे भारतीय संसदेतील स्थायी समितीचे अध्यक्ष जयराम रमेश आरेमध्ये असलेल्या आदिवासी पाड्यांतील आदिवासी समाजातील प्रतिनिधी व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. आरे गेस्ट हाऊस येथे १७ सेप्टेंबर, रोजी ही भेट होणार आहे. आरेमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २,७०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाविरोधात सध्या जोरदार आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रमेश मुंबई येत आहेत. त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments