skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकर्नाटकात ‘ईव्हीएम मशिनचा’ विजय असो : राज ठाकरे

कर्नाटकात ‘ईव्हीएम मशिनचा’ विजय असो : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो. अस राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहे.

राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ट्विटरवरुन आपले मत मांडले.

#KarnatakaElections
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो.

— Raj Thackeray (@RajThackeray) May 15, 2018

भाजपने कर्नाटकात तुफान आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी काँग्रेस सध्या 60-70 जागांमध्ये घुटमळताना दिसते आहे.

काँग्रेसच्या काही नेत्यांनीही ईव्हीएम मशिनचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ईव्हीएमवरुन कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments