skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउपोषण सोडा, लोकांची कामं करा, सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला!

उपोषण सोडा, लोकांची कामं करा, सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला!

supriya sule, NCPदौंड: विरोधी पक्षांविरोधात भाजपाने आज केलेल्या एकदिवसीय उपोषणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली. भाजपाचे लोक आज उपोषण करीत आहेत. आज एकादशी आहेच, लोक आज असाही उपवास करतातच. भाजपच्या लोकांचे हे उपोषण ढोंगी आहे. लिंबू सरबत पिऊन कोणतं उपोषण होतं का, असा सवाल करत उपोषण सोडा आणि थोडं काम करा असा सल्ला दिला. दौंड येथील हल्लाबोल यात्रेत त्या बोलत होत्या.

भाजपचे लोक आज उपोषण करीत आहेत. आज एकादशी आहेच, लोक आज असाही उपवास करतातच. भाजपच्या लोकांचे हे उपोषण ढोंगी आहे. लिंबू सरबत पिऊन कोणतं उपोषण होतं का ? त्यामुळे उपोषण सोडा आणि थोडं काम करा.

या सरकारने चांगली नावे देऊन योजना जाहीर केल्या पण त्या योजनांना निधीच दिला नाही. त्यातल्या काही योजना तर फसव्या निघाल्या. मोठ्या दिमाखात जाहीर केलेल्या योजनांचे पुढे काहीच झाले नाही. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना दौंड भागातील मुद्दे प्रलंबित नसायचे. पण आताचे पालकमंत्री कोण हे लोकांना माहीत देखील नव्हते. जेव्हा पालकमंत्र्यांची जीभ घसरली तेव्हा लोकांना त्यांचं नाव माहीत झालं, असा खोचक टोला गिरीश बापट यांना लगावला. दौंड तालुक्यातील शेतकरी आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. ते दौंडमध्ये आले पण शेतकऱ्यांना भेटले नाही. शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला पण त्यांनी दुर्लक्ष केले मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या.चालून चालून त्यांच्या पायाला जखमा झाल्या मात्र मुख्यमंत्र्यांना पाझर फुटला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments